संजय राऊत यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी जनहित याचिका दाखल

0

मुंबई,दि.२०: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. संजय राऊत हे सातत्याने आक्रमकपणे भाजपावर टीका करत आहेत. भाजपाचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना एयएनएस विक्रांत प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता बार काऊन्सीलने राऊत यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केलीय. विशेष म्हणजे यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांचीही नावं आहेत.

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी इंडियन बार असोसिएशनने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबतच इतरांविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. “उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींविरोधात खोटे, (प्रतिष्ठेला) कलंक लावणारे आणि अवमानजनक आरोप केल्याप्रकरणी” ही याचिका दाखल करण्यात आल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. अर्जदाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा याचिकेमध्ये प्रतिसादकर्ते म्हणून उल्लेख केलाय.

संजय राऊत म्हणाले काय होते?

एखाद्या विशिष्ट पक्षाच्या आणि विचारसणीच्या लोकांना न्यायालयाकडून रांगेत दिलासे कसे मिळतात असा प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी विक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्यांना मिळालेल्या दिलाश्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना राऊत यांनी भाजपाच्या लोकांना न्यायालयाकडून दिलासा कसा काय मिळतो, यासाठी न्यायव्यवस्थेमध्ये काही विशिष्ट लोक बसवली आहेत का?, असे प्रश्न उपस्थित केले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here