सोलापूर,दि.24: संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर आज सकल मराठा समाजाच्यावतीने सोलापुरातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या गावी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
समस्त मराठा समाज कोंडी ग्रामस्थांच्यावतीने मराठा आरक्षणाचा सगे सोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी कोंडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. या आंदोलनात कोंडी येथील वारकऱ्यांनी सुद्धा सामील होऊन शासनाचे लक्ष वेधले. यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा बंदोबस्तसाठी होता.