पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या दिवशी होणार सोलापुरात सभा

0

सोलापूर,दि.26: सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोमवार 29 एप्रिलला दुपारी बारा वाजता होम मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू साठी नेटकी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती लोकसभा  निवडणूक सहप्रमुख शहाजी पवार यांनी दिली. 

या सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, हेही उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी होम मैदानावर नेटकी व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेस येणारे नागरिक, कार्यकर्ते यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना  करण्यात येत आहेत.

सभेला होणारी गर्दी लक्षात घेऊन सुमारे 80 हजार ते एक लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. भर दुपारी सभा असल्याने लोकांना रखरखत्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सावलीची व्यवस्था करण्यात येत आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी विविध कमिटीच्या माध्यमातून भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

सभेच्या ठिकाणी महिलांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय व्यवस्था आणि आपत्कालीन व्यवस्थाही तैनात करण्यात येणार येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या हिताचे भाषण ऐकण्यासाठी सोलापुरातील नागरिक, महिला, शेतकरी, कार्यकर्ते, उद्योजक यांनी सभेला  उपस्थित रहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने पवार यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here