नवी दिल्ली,दि.14: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांना येत्या दीड वर्षात दहा लाख लोकांची भरती करण्यात यावी असे सांगितले आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) मंगळवारी ही माहिती दिली. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सांगितले की, सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी हे निर्देश दिले आहेत.
PMO ने ट्विट केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेतला आणि सरकारला पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती करण्याचे निर्देश दिले.”
बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
पीएमओच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, “बेरोजगार तरुणांची वेदना समजून घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. नवीन नोकऱ्या निर्माण करण्यासोबतच 1 कोटींहून अधिक ‘स्वीकृत पण रिक्त’ पदे भरण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी जलद गतीने पावले उचलावी लागतील.