पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला राम मंदिर कार्यक्रमाचा अप्रतिम व्हिडीओ

0

नवी दिल्ली,दि.23: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर कार्यक्रमाचा अप्रतिम व्हिडीओ शेअर केला आहे. अयोध्येत बांधलेल्या नवीन राम मंदिरात रामलला प्राण प्रतिष्ठापना हा संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 22 जानेवारी 2024 रोजी रामललाच्या पुनर्गामनाचा क्षण इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवला गेला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Xवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना पीएम मोदींनी लिहिले की, “आम्ही काल 22 जानेवारीला जे पाहिलं ते पुढची अनेक वर्षे आमच्या आठवणींमध्ये जिवंत राहील.”

रामललाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला 7,000 पाहुणे आले होते. यामध्ये भारतातील अनेक उद्योगपती आणि सेलिब्रिटींचा समावेश आहे. या क्षणाचे सर्वजण साक्षीदार आहेत. पीएम मोदींच्या व्हिडिओमध्ये लोकांमध्ये वेगळाच उत्साह दिसत असून लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत आहेत. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलला परतले आहेत. 

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, आम्ही 22 जानेवारीला अयोध्येत जे बघितले, ते आयुष्यभर स्मरणात राहील. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी शेअर केलेल्या या 3.05 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अयोध्येतील सर्व स्मृती कैद आहेत. अगदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोहोचण्यापासून, ते गर्भ गृहातील रामललांची पूजा, आरती आणि भाविकांचे भाव, इथपर्यंतचे सर्व सर्व क्षण या व्हिडिओमध्ये कैद आहेत.

या व्हिडिओमध्ये, पंतप्रधान जेव्हा उपस्थितांना भेटण्यासाठी गेले तो क्षण आणि भक्तांवर फूलांचा वर्षावर करतानाचा क्षणही कैद आहे. अर्थात या छोट्याशा व्हिडिओ ते सर्व क्षण आहेत, जे तुम्हाला बघावेसे वाटतील. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा काही अंशदेखील देण्यात आला आहे. यात “शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम आले आहे.” असे मोदी म्हणत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here