वाराणसी,दि.13: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या वाराणसी (Varanasi) दौऱ्यावर आहेत. त्यांनी काशी विश्वधाम कॉरिडोअरचं (Kashi Vishwanath Dham Corridor) लोकार्पण केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक निराळे रुप पहायला मिळाले.
लोकार्पण आणि इतर कार्यक्रम आटोपल्यावर भोजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सफाई कामगारांसोबत (Sweepers) बसून जेवण करताना दिसून आले. (Prime Minister Narendra Modi had a meal with the cleaners)
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही (CM Aadityanath Yogi) दिसून आले. त्यानीही सफाई कामगारांसमोबत बसून भोजन केले.

यावेळी जवळपास 2500 कामगारांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींच्या आवडीचे गुजराती भोजनही बनवण्यात आले होते.
पंतप्रधान मोदी जिथे जातील तिथे तिथल्या संस्कृतीत सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याचं हेच वेगळेपण नेहमी त्यांना चर्चेत ठेवते. तेच आजही वाराणसीत दिसून आले आहे.