दि.19: Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात साजरी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) फोटो शेअर करत शिवाजी महाराजांना (Shivaji Maharaj) अभिवादन केलंय. राज्यात फटाक्यांची आतिषबाजी होत आहे, पाळणा गाऊन महाराजांच्या जन्माचे स्वागत केले जात आहे, मिठाई वाटली जात आहे. सोशल मीडिया शिवमय झाला आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. देशभरात शिवाजी महाराजांची जयंती साजरी होती.
महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी रोजी उत्सवाचं वातावरण असतं. गावागावात महाराजांचे (Shivaji Maharaj) पोवाडे गायले जातात, व्याख्यानं ठेवली जातात. सामाजिक आणि विधायक उपक्रमांनी या उत्सवातून सामाजिक भान जपलं जातं. महाराजांच्या उंचच उंच मूर्तीची पुजा होते, अश्वारुढ पुतळ्यांच मिरवणूकही निघते. तर, अनेक कलाकार आपल्या कलेतून महाराजांची प्रतिमा साकारतात. महाराजांना देशभरातून अभिवादन होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी जयंतीदिनी शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी जयंती साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त मोदींनी ट्विट करुन अभिवादन केलंय, तसेच शिवाजी महाराज हे महान महानायक आणि भारताचा गौरव असल्याचं मोदींनी म्हटलंय. ठाणे-दिवा खंडावरील दोन अतिरिक्त रेल्वे मार्गांचे उद्घाटन केल्यानंतर आणि नवीन उपनगरीय रेल्वेगाड्यांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर शुक्रवारी ते बोलत होते. मोदींनी ट्विट करुनही, ”छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”, असे मोदींनी म्हटले आहे.