प्रयागराज,दि.29: महाकुंमेळाव्यातील मौनी अमावस्येच्या दुसऱ्या अमृत स्नान सोहळ्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रयागराजला पोहोचत आहेत. दरम्यान, संगम स्थानावर अचानक गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त आहे. सध्या सात जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना कुंभ परिसरातील सेक्टर 2 मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाकुंभमेळाव्यामध्ये संगमस्थळी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आजचा अमृतस्नान रद्द करण्यात आले आहे. आखाडा परिषदेने हा निर्णय घेतला आहे.
आखाड्यांमधील अमृत स्नान बंद करण्याचे आवाहन प्रशासनाने आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी यांना केले होते, त्यानंतर हे अमृत स्नान तात्पुरते थांबवण्यात आले आहे.
माहितीनुसार, चेंगराचेंगरीनंतर अमृतस्नान तात्पुरते पुढे ढकलण्यात आले आहे. आखाडे आपल्या छावणीत परतत आहेत.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या विशेष कार्यकारी अधिकारी आकांक्षा राणा म्हणाल्या, ‘संगम मार्गावरील काही बॅरिकेडस तुटल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. काही लोक जखमी झाले आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही काही गंभीर परिस्थिती नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संगम नाक्यावर पोल क्रमांक 11 ते 17 दरम्यान हा अपघात झाला. जखमींना रुग्णवाहिकेतून सतत रुग्णालयात आणले जात आहे. सर्व जखमींना मेळावा परिसरातील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.