Prataprao Patil Chikhalikar: स्वामी दर्शनासाठी महेश इंगळे यांचे उत्कृष्ट नियोजन : खासदार प्रतापराव पाटील

0

अक्कलकोट,दि.22: Prataprao Patil Chikhalikar On Mahesh Ingale: भाविकांना स्वामी दर्शनासाठी महेश इंगळे (Mahesh Ingale) यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याचे मनोगत नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Prataprao Patil Chikhalikar ) यांनी व्यक्त केले आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महेश इंगळे हे नेहमीच भाविकांना उत्कृष्ट स्वामी दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात मग्न असतात. त्यांच्या प्रयत्नातून भाविकांना सुलभ स्वामी दर्शनाचा लाभ होऊन स्वामी दर्शनाच्या तीर्थाने भाविकांचे हृदय मंदिर पवित्र होत आहे. असे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे.

उत्कृष्ट नियोजनाचे श्रेय महेश इंगळे यांनाच | Prataprao Patil Chikhalikar On Mahesh Ingale

उत्कृष्ट नियोजनाचे श्रेय महेश इंगळे यांनाच असून आज त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आम्हालाही मन प्रसन्न करणारे स्वामी दर्शन लाभले, आणि स्वामी दर्शनाच्या तीर्थाने आमचेही हृदय मंदिर पवित्र झाले असल्याचे मनोगत पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले. त्यांनी नुकतेच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, गिरीश पवार, स्वामीनाथ लोणारी, आकाश शिंदे, लखन गवळी आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here