प्रतापराव जाधव यांचा मोठा दावा, शिवसेनेचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात येणार

या अगोदर देखील खासदार प्रतापराव जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट केला होता. त्या अनुषंगाने या खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले होते

0

बुलडाणा,दि.22: एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) खासदार प्रतापराव जाधव यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात येतील, असा दावा जाधव यांनी केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटात इन्कमिंग सुरूच आहे. गजानन कीर्तिकर यांच्या सारखे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिंदे गटात सामील झाले आहे.

बुलडाणा जिल्ह्याचे शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एक गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक च्या तोंडावर 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात 100 टक्के येतील असा दावा केला आहे.

गजानन कीर्तिकर यांच्यानंतर 3 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे. आम्ही लोकांमध्ये राहणारे आहोत. आणखी काही लोक आमच्या संपर्कामध्ये आहे. पण काही स्थानिक अडचणी आहे, जिल्ह्यातील काही काम आहे. नेतृत्वावर प्रेम आहे म्हणून ते तिकडे थांबलेले आहे. जशा निवडणुकासमोर येतील शिवसेनेचे घर खाली झालेले असेल, असा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

या अगोदर देखील खासदार जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट केला होता. त्या अनुषंगाने या खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा खासदार जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here