सोलापूर,दि.11: सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मेला मतदान झाले. सोलापूर लोकसभेसाठी 59.19 टक्के मतदान झाले. एकुण 2030119 मतदारांपैकी 1201586 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यात सरळ लढत आहे. ग्रामीण भाग व शहरी भागातून मतदान चांगले झाले आहे. अशातच आमदार प्रणिती शिंदे या 23000 मताधिक्यांनी निवडून येतील असा दावा राष्ट्रीय छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी केला आहे.
योगेश पवार यांनी यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये “07 मे 2024 रोजी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण 2030119 मतदानापैकी सोलापूरात 1166600 इतके मतदान झालेले आहे. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख तिन्ही पक्षाची मते व यावेळेस झालेले एकूण मतदान आणि मराठा,मागासवर्गीय, मुस्लिम समाजाची मानसिकता व त्याचा मतदानानंतरचा कौल विचारात घेवून अंदाज काढलेला आहे.” असे म्हटले आहे.
पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “त्या अंदाजानुसार भाजपच्या राम सातपुते यांना 554000 इतकी मते मिळतील, तर कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 577000 इतकी मते मिळतील व अन्य सर्व उमेदवारांना 35600 इतकी मते मिळतील. त्यामुळे कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे ह्या 23000 मतांनी विजयी होण्याची दाट शक्यता आहे.