सोलापूर,दि.5: काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या सोलापूर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. तर भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे पराभूत झाले आहेत आहेत. मोहोळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक जास्त मतदान झाले होते. प्रणिती शिंदे यांनी प्रचारात पहिल्या दिवसापासून आघाडी घेतली होती. त्यांनी स्थानिक मुद्द्यावर जोर दिला होता.
सोलापूर लोकसभा मतदार संघात 1201586 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 645015 पुरूषांनी तर 556515 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पुरूषांची टक्केवारी 61.93 तर महिलांची 56.30 टक्के आहे.
मोहोळ विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 63.15 टक्के मतदान झाले आहे. मोहोळ विधानसभा मतदार संघात एकुण 319808 मतदार आहेत. यापैकी 201965 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सोलापूर शहर मध्य मतदार संघात सर्वात कमी 56.51 टक्के मतदान झाले होते.
या मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य | Praniti Shinde
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना १२८२८९ मते मिळाली आहेत. तर भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना ६५१३७ मते मिळाली आहेत. येथून प्रणिती शिंदे यांना ६३१५२ मताधिक्य मिळाले आहे.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना ७१४५४ मते मिळाली आहेत. तर राम सातपुते यांना १०७३८१ मते मिळाली आहेत. येथून राम सातपुते यांना ३५१२७ मताधिक्य मिळाले आहे.
सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना ९०४६८ मते मिळाली आहेत. तर राम सातपुते यांना ८९६७२ मते मिळाली आहेत. येथून प्रणिती शिंदे यांना ७१६ चे मताधिक्य मिळाले आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना ९७९५४ मते मिळाली आहेत. तर राम सातपुते यांना १०७२५१ मते मिळाली आहेत. येथून राम सातपुते यांना ९२९७ चे मताधिक्य मिळाले आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून प्रणिती शिंदे यांना १०५४७४ मते मिळाली आहेत. तर राम सातपुते यांना ९६०३८ मते मिळाली आहेत. येथून प्रणिती शिंदे यांना ९४३६ चे मताधिक्य मिळाले आहे.
मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघातून प्रणिती शिंदे यांना १२४७११ मते मिळाली आहेत. तर राम सातपुते यांना ७९२९१ मते मिळाली आहेत. येथून प्रणिती शिंदे यांना ४५४२० चे मताधिक्य मिळाले आहे.