सोलापूर,दि.१३: Praniti Shinde On Solapur Heavy Rain: आम्ही निवडणुकात ईव्हीएम मशीनवर नाही तर जनतेच्या बळावर निवडणून आलो आहोत, असे सांगत खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेतील कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेतील अधिकारी भाजपा आमदारांचे ऐकूनच काम करतात असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत चाळीस कोटी रुपये निधीतून काम करताना महापालिका प्रशासनाने खासदारांना डावलून फक्त सत्ताधारी भाजप आमदारांनी सांगीतलेली रस्त्यांची कामे घेतली असा आरोप करत खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर तिव्र संताप व्यक्त केला. या विषयावर लोकसभेत हक्कभंग आणावा लागेल असा खणखणीत इशाराही दिला.
बुधवारी रात्री पडलेल्या प्रचंड पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेकडो घरात पाणी शिरले आणि गरीबांचा संसार उघड्यावर आला. ज्या भागात पाणी शिरले आणि लोकांचे नुकसान झाले त्या भागांची पाहणी केल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम योजने अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाबद्दलची नाराजी व्यक्त केली. (MP Praniti Shinde News)
गेल्या दोन दिवसांत पावसामुळे सोलापूर शहर जलमय झाले याला महापालिका प्रशासनाची निष्क्रियताच कारणीभूत असल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केला. महापालिकेचे अधिकारी भाजपा आमदारांचे ऐकून काम करतात याबद्दलचा संतापही व्यक्त करतानाच पावसाच्या पाण्यात गोरगरीबांचे संसार वाहून गेले याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित केला. (Praniti Shinde Solapur)
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त तैमूर मुलानी, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, उपअभियंता प्रकाश दिवाणजी तसेच काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, माजी महापौर अलका राठोड, माजी नगरसेवक विनोद भोसले, गणेश डोंगरे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. विविध प्रश्न उपस्थित करत आयुक्त अतिरिक्त आयुक्त आणि नगर अभियंता यांना खडे बोल सुनावले. अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांच्या विविध प्रश्नांवर वरिष्ठ अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसून आले. खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष नरोटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

एन कॅप ही केंद्र शासनाची योजना आहे. चाळीस कोटीचा निधी सोलापूर महापालिकेसाठी मंजूर झाला आहे. मात्र या योजनेतील विविध कामांची यादी करीत असताना भाजपच्या आमदारांच्या कामांचा केवळ समावेश करण्यात आला आहे. आपण वेळेत कामांच्या यादीचे पत्र महापालिकेला सादर करूनही त्यापैकी एकाही कामाचा समावेश या योजनेत केला नाही. सरळ सरळ डावलण्यात आले आहे असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.
तातडीने ही यादी रद्द करून निविदा प्रक्रिया थांबवा. आमची ही कामे समाविष्ट करा. चुकीच्या पद्धतीने सिस्टीम राबवण्यात आली आहे. एकतर्फी कारभार करण्यात येत आहे. पूर्णपणे सर्व सिस्टीम ढासळली आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने ही व्यवस्था कोलमडली आहे. खासदारांच्या कामांना डावलले जातेच कसे ? यावरून प्रणिती शिंदे या चांगल्याच भडकल्या.
दूध का दूध आणि पाणी का पाणी का करा | Praniti Shinde On Solapur Heavy Rain
एवढा भ्रष्टाचार यापूर्वी कधी झालाच नाही. सर्व यादी रद्द करून खासदारांच्या कामाचा समावेश करावा. या योजनेची यादी करीत असताना महापालिका आयुक्तांनी खासदारांना का विचारले नाही? चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे. अशी प्रक्रिया होतेच कशी? तीन आमदारात निधी वाटून घेतला. निधी केंद्र शासनाचा असताना खासदारांना डावलणे चुकीचे आहे. नवी प्रथा महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. खालच्या थराचे राजकारण केले जात आहे. आत्ताच “दूध का दूध आणि पाणी का पाणी का करा” जे चालले आहे ते चुकीचे चालले आहे, अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी संताप व्यक्त केला.
आम्ही निवडणुकात ईव्हीएम मशीनवर नाही तर जनतेच्या… | Praniti Shinde Solapur
यापूर्वी मी विविध समित्यांमध्ये कार्यरत होते एखाद्या समितीची मीटिंग मी महापालिकेत आणली असती तर महापालिकेतील अधिकारी निलंबित झाले असते. मात्र तसे मी केले नाही. पूर्ण व्यवस्था ढासळली आहे.गेल्या अनेक निवडणुकात आम्ही ईव्हीएम मशीनवर नाही तर लोकांमुळे निवडणून आलो आहोत. खासदारांची कामे कशी काय डावलली जातात असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी आयुक्तांना विचारला.प्रशासक नेमायचा. महापालिकेच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत आणि चुकीच्या पद्धतीने कारभार करायचा. लोकांची कामे करायची नाहीत. एक नवी प्रथा महाराष्ट्रात सुरू केली जात आहे. खालच्या थराचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मंगळवारपर्यंत लेखी उत्तर देणार: आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे
बैठकीत प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी काय कार्यवाही करणार असा प्रश्न आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना उपस्थित केला. त्यावर येत्या मंगळवारपर्यंत एनकॅप योजनेअंतर्गत खासदारांच्या पत्रास उत्तर देईन. खासदारांच्या पत्रानुसार कामांचा समावेश करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.