Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला सावध राहण्याचा सल्ला

Politics: काँग्रेस राष्ट्रवादीपासून सावध राहण्याचा सल्ला

0

मुंबई,दि.14: Prakash Ambedkar On Politics: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना काँग्रेस, राष्ट्रवादीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. मी काँग्रेसला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. काँग्रेस आणि शरद पवार यांना चांगल्या प्रकारे ओळखणारा माझ्याएवढा राज्यात दुसरा नेता नाही. ते तुम्हाला फसवतील. शिवसेनेने त्यांच्यासाठी थांबू नये, असा इशारा आम्ही उद्धव ठाकरेंना दिलेला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

हेही वाचा MLA Sunil Kedar: काँग्रेस आमदार सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा

आमची शिवसेनेशी युती | Prakash Ambedkar

महापालिका निवडणुकीमध्ये आमची शिवसेनेशी युती झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी युतीचा अंतिम निर्णय घ्यायचा आहे. मात्र, युती कधी जाहीर करायची, ते ठाकरे यांनी ठरवायचे आहे. ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायचे आहे. आपण एकत्र पत्रकार परिषद घेऊ, असेही त्यांनी सांगितल्याचे ते म्हणाले.

Prakash Ambedkar On Politics
ॲड. प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट | Prakash Ambedkar On Politics

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत युतीची चर्चा सुरू असतानाच आंबेडकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने आंबेडकर – शिंदे युतीची चर्चा सुरू झाली. मात्र, ही भेट इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भातच होती. असे सांगत आंबेडकर यांनी गुरुवारी या चर्चेला पूर्णविराम दिला. आगामी निवडणुकांत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच युती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपची साथ सोडावी, मगच शिंदेंशी चर्चा!

प्रत्येक भेटीगाठी या राजकीयच असतील, असा संबंध जोडणे चुकीचे असल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडली तरच त्यांच्याशी राजकीय चर्चा होऊ शकते. आम्ही  भाजपसोबत कधीही जाणार नाही, याचा पुनरूच्चार त्यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here