Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांचे निवडणूक आयोगाच्या निकालावर महत्वाचे विधान

0

सोलापूर,दि.१८: Prakash Ambedkar On Election Commission’s Decision: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर महत्वाचे विधान केले आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर जोरदार टीका केली.

शिंदे गटाचा ताबा राहणार

शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा ताबा राहणार आहे. उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख पद लोकशाही तत्त्वाचे पालन करून तयार केलेले नव्हते, असे नमूद करून आयोगाने ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला.

प्रकाश आंबेडकर यांनी दिली प्रतिक्रिया | Prakash Ambedkar

या निर्णयानंतर शिंदे गटाकडून आनंद व्यक्त केला जात आहे. शिंदे गटातील आमदार, खासदार तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ठाकरे गटाशी युती असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी निवडणूक आयोगाचा निकाल तसेच ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय… | Prakash Ambedkar On Election Commission’s Decision

निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घेणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणं हे निवडणूक आयोगाचं काम नसल्याचे आंबेडकर म्हणाले. तसेच निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सांगितले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here