Praful Patel On NCP Crisis: शरद पवारांना भेटल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले…

0

मुंबई,दि.१६: Praful Patel On NCP Crisis: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (दि.१७) सुरू होणार आहे. अजित पवार गटाचे मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट वाय बी चव्हाण सेंटरमध्ये घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल माध्यमांशी बोलताना म्हणाले, आमचे दैवत, आमचे नेते शरद पवार यांचा आम्ही सर्वांनी आशीर्वाद घेतला.’ शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सर्वांनी शरद पवारांची भेट घेतली.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल? | Praful Patel On NCP Crisis

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित राहावा ही सर्वांची इच्छा आहे असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. शरद पवार यांचा वेळ न घेता आम्ही संधी साधत शरद पवारांची भेट घेतल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. पक्ष एकत्रित राहावा अशी सर्वांची इच्छा असून शरद पवारांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले मात्र काहीही प्रतिक्रिया दिली नाही, असेही पटेल म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here