Uddhav Thackeray On Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांची औरंगजेबाच्या कबरीला भेट, उध्दव ठाकरे म्हणाले…

0

मुंबई,दि.२०: Uddhav Thackeray On Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांची औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. यावर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खुलताबाद येथे जावून औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीवरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात सत्ताधारी भाजपाने या प्रकारावरून उद्धव ठाकरेंना टार्गेट केले. कारण उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली असून प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे | Uddhav Thackeray On Prakash Ambedkar

मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपासोबत आमची युती होती तेव्हा अडवाणीही जिनाच्या कबरीवर नतमस्तक झाले होते. नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक खायला आपले पंतप्रधान गेले होते. लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात आणि प्रत्येकवेळी निवडणुकीत एखादा चेहरा चालत नसेल तर तिकडे जय बजरंग बली करायचे, कधी दाऊदचा चेहरा, कधी औरंगजेबाचा चेहरा, औरंगजेबाच्या मुद्द्यावरून दंगल घडवणारे हे और दंगाबाद आहेत. यांना दंगली पेटवायच्या आहेत आणि कारभार करायचाय असा आरोप भाजपावर करत आता स्पष्ट आणि एकाविचाराने पुढे जाण्याची गरज आहे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांना दिला.  

समान नागरी कायद्यावर आमचा…

समान नागरी कायद्यावर आमचा आक्षेप नाही. या कायद्याने फक्त मुस्लिमांना त्रास होईल म्हणून ते आणत आहेत. आम्ही पाठिंबा देऊ. पण या कायद्याने हिंदूंना त्रास होणार की नाही हेदेखील लोकांसमोर ठेवावे. समान नागरी कायदा आणण्यापूर्वी गोवंश हत्याबंदी कायदा काश्मीरापासून कन्याकुमारीपर्यंत करा. त्रिपुरात गोवंश हत्याबंदी नाही. समान नागरी कायद्यात गोवंश हत्याबंदी कायदा असणार की नाही? समान नागरी कायदा प्रत्येक गोष्टीत व्हायला हवी. कायदा समान ठेवायचा मग त्यांच्यावरील नेत्यांवर झालेले आरोप त्याची चौकशी का होत नाही. कायदा समान ठेवा असं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपावर आरोप केले.  

मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही
 
राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. महिलांना शिवीगाळी करणारे मंत्री होतात पण महिला मंत्री होत नाही. हे कुठले राज्य आहे असं सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली.  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here