Politics: शिंदे गटाचे संजय गायकवाड भाजपाच्या गिरीश महाजनांच्या विधानानंतर आक्रमक

Politics: महाजन यांनी राज्यातील सत्तांतरावर केलं होतं वक्तव्य

0

बुलडाणा,दि.12: Politics: शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) भाजपाचे मंत्री गिरीश महाजनांच्या (Girish Mahajan) विधानानंतर आक्रमक झाले आहेत. शिवसेना पक्षात फूट पाडण्यासाठी भाजपाने ‘ऑपरेशन’ राबवले असे विधान भाजपाने नेते गिरीश महाजन यांनी केले. महाजनांच्या या विधानानंतर ठाकरे आणि शिंदे गटाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. गिरीश महाजन यांच्या याच विधानावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही क्रेडिट घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. आम्हाला कोणाचीही फूस नव्हती. आम्हाला कोणीही भूलवलेलं नाही. आम्ही आमच्या मनाने बंड केले, असे संजय गायकवाड म्हणाले आहेत. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते. (Politics Maharashtra)

आमदार संजय गायकवाड आक्रमक | Politics

“कोणी मुर्खासारखे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला काहीही अर्थ नाही. शिवसेनेचे सर्व आमदार बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे होते. आम्हाला वर्षा बंगला तसेच मातोश्रीवर प्रवेश नव्हता. कामासाठी बैठका होत नव्हत्या. सतत सगळे आमदार त्रास्त झाले होते. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची कामं जोमात चालू होती. आमचा स्थानिक पातळीवरील लढा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत होता,” असे संजय गायकवाड म्हणाले.

Politics
आमदार संजय गायकवाड

कित्येक वेळा उद्धव ठाकरेंकडे… | Politics Maharashtra

“स्थानिक पातळीवरील आमचा जो संघर्ष सुरू होता तो थांबवण्यासाठी आम्ही कित्येक वेळा उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली. मात्र ते शेवटपर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून बाहेर पडले नाहीत. शेवटी त्यांनी आमदार सोडले, मुख्यमंत्रीपद सोडलं मात्र राष्ट्रवादी, काँग्रेसला सोडलं नाही. त्यामुळेच आम्हाला बंडखोरीचा निर्णय घ्यावा लागला,” असेही संजय गायकवाड यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी त्या काळात…

“एकनाथ शिंदे यांनी त्या काळात सर्व आमदारांना मदत केली. तसेच राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना जी वागणूक देण्यात आली, त्यामुळे सर्वांचा बांध फुटला आणि काहीही ठरलेलं नसताना सर्वजण अंगावरच्या कपड्यांवर बाहेर पडले. त्यामुळे कोणीही क्रेडिट घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. कोणी भूलवलं आणि आम्ही गेलो असं झालेलं नाही. आम्ही स्वाभिमानाने गेलो होते. आम्हाला आघाडी पसंद नव्हती. आम्हाला भाजपा-शिवसेनेची युती आणि सन्मान महत्त्वाचा होता,” असे म्हणत संजय गायकवाड यांनी गिरीश महाजन यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here