“आजच्या निकालाचा परिणाम 2024 मध्ये…” शरद पवार

0

सातारा,दि.3: मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. मात्र आजच्या निकलाचा परिणाम 2024 मध्ये होणार नाही. महाराष्ट्रात भाजपा आणि मित्र पक्षांची सत्ता येणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला. ते साताऱ्यात बोलत होते. सध्या तरी मोदींना अनुकुल असा ट्रेण्ड आहे, तो मान्य केला पाहिजे, असे देखील शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, आजच्या निकालाचा परिणाम इंडिया आघाडीवर होणार नाही. भाजपला अनुकूल ट्रेन्ड सध्या दिसतोय हे मान्य केला पाहिजे. मंगळवारी 6 वाजता इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे.  राज्यातील जाणकारांकडून माहिती घ्यायची आहे. खरी माहिती येत नाही तोपर्यंत ईव्हीएमला दोष देता येणार नाही. मंगळवारी 6 वाजता इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे.

राहुल गांधीच्या सभेचा चांगला परिणाम

शरद पवार म्हणाले, बीआरएसने स्वत:च्या राज्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांना पराभावाला सामोरे जावे लागणर आहे. राहुल गांधीच्या सभेचा चांगला परिणाम झाला आहे. राहुल गांधीच्या निकालानंतर विजयाची खात्री होती. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. नवीन लोकांना संधी द्यावी असा ट्रेन्ड दिसत आहे. राहुल गांधींची हैदराबादला सभा झाली तिथे आता संध्याकाळी 5 नंतर चित्र स्पष्ट होईल. मी निवडणूक प्रचारात सहभागी नव्हतो. दिल्लीत बैठक होणार आहे त्यानंतर या विषयी बोलणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here