Sachin Sawant On Modi: …तर नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अनेक नेत्यांना जन्मठेप होईल

0

मुंबई,दि.२३: Sachin Sawant On Modi: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेली टीका महागात पडली आहे. मोदी आडनावावरून अपमान केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या खटल्यात राहुल गांधींना सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षाची शिक्षा सुनावली. 

काय आहे प्रकरण?

राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा प्रचारावेळी मोदींवर टीका करताना सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असा सवाल केला होता. याविरोधात गुजरातमधील मोदी समाजाने राहुल गांधींवर खटला दाखल केला होता. सुरतच्या सीजेएम कोर्टाने सकाळी ११ वाजता आपला निर्णय दिला आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर विविध राजकीय राजकीय प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही या निर्णयावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

सचिन सावंत यांची टीका | Sachin Sawant On Modi

एखाद्या राजकीय विधानावर दोन वर्षांची शिक्षा केवळ मोदींच्या न्यू इंडियात होऊ शकते, असे म्हणत सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीटद्वारे पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. तसेच हाच नियम लागू केला तर पंतप्रधान मोदींसह भाजपाचे अनेक नेत्यांना जन्मठेप होईल, असेही ते म्हणाले.

प्रियंका गांधी-वाड्रांची टीका

दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी ट्वीट करत हल्लाबोल केला आहे. “घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण, माझा भाऊ कधी घाबरला आणि घाबरणारही नाही… सत्य बोलत आलो आणि सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू… करोडो देशवासीयांचं प्रेम राहुल गांधींच्या पाठीशी आहे,” असं प्रियंका गांधींनी ट्वीट करत म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here