नवी दिल्ली,दि.9: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. सोशल मिडीया प्लॅटफार्म X वर व्हिडीओ शेअर करत नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होत आहे. 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाले आहे. 13 मे रोजी चौथ्या टप्प्याचे मतदान होणार आहे.
राहुल गांधी सातत्याने भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. काँग्रेसने जाहिरनाम्यात 30 लाख पदांची भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे. महिलांना वर्षाला 1 लाख रूपये देण्याचे जाहीर केले आहे. देशातील युवा ही देशाची शक्ती आहे. नरेंद्र मोदी यांच्या हातून निवडणूक निसटत चालली आहे. ते पुन्हा भारताचे पंतप्रधान बनणार नाहीत. म्हणून त्यांनी निर्णय घेतला असून, काही ना काही करून ध्यान भटकावण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे गांधी म्हणाले.
ते काहीतरी नाटक करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. बेरोजगारी हा एक मोठा मुद्दा आहे. ते खोटे बोलत आहेत. ‘भरती भरोसा स्कीम’च्या माध्यमातून तरूणांच्या हाताला काम मिळणार आहे.
राहुल गांधी यांनी X वर कॅप्शनच्या माध्यमातून म्हणाले की, 4 जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार बनत आहे आणि 15 ऑगस्टपर्यंत आम्ही देशातील 30 लाख रिक्त सरकारी पदांच्या भरती प्रक्रियेचे काम सुरू करणार आहोत ही आमची गॅरंटी आहे. नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, तुम्ही तुमच्या मुद्द्यांवर ठाम राहा. INDIA की सुनो, नफ़रत नहीं, नौकरी चुनो।