“काही झाले तरी सोलापूरचा खासदार काँग्रेसचा असेल…” आमदार प्रणिती शिंदे

0

सोलापूर,दि.17: काही झाले तरी सोलापूरचा खासदार काँग्रेसचा असेल असे काँग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी म्हटले आहे. राज्यातील खोके सरकारला जनतेच्या प्रश्नांचे काही पडले नसून जनता निराश झाली आहे. त्यामुळेच या सरकारला जनतेतून पाठिंबा नसल्याने हे सरकार निवडणुकांना सामोरं जायला घाबरत असल्याने महापालिका आता बहुदा लोकसभेनंतर किंवा विधानसभेनंतर होतील असा टोला काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी लगावला. यावेळी काही झाले तरी सोलापूरचा खासदार काँग्रेसचा असेल आणि पंढरपूरचा आमदारही लोकशाही आघाडीचा असेल असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.

पंढरपूर येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आल्या असता त्या बोलत होत्या. आपणावर पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती आपण पार पाडू अशा शब्दात त्यांनी सोलापूर लोकसभा उमेदवारीबाबत स्पष्ट संकेत दिले. यावेळी काही झाले तरी सोलापूरचा खासदार काँग्रेसचा असेल आणि पंढरपूरचा आमदारही लोकशाही आघाडीचा असेल असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या निवडणुका…

सरकारच्या विरोधात लोकमत असल्याने ते महापालिकेच्या निवडणुका घ्यायला घाबरत असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली. त्यामुळे या निवडणुका लोकसभा आणि विधानसभेनंतर होतील अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र विकला जातोय

राज्यातील कंत्राटी भरतीवरून सरकारवर टीका करताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सध्याचे राज्य सरकार हे सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बिंदू नामावली आणि आरक्षण रद्द करण्याचे कट कारस्थान सुरु असून हे सरकार त्यांच्या मर्जीतील सहा ठेकेदारांना महाराष्ट्र विकत आहे. एका बाजूला नोकऱ्या देण्याचे आश्वासन देताना दुसऱ्या बाजूला कायम नोकऱ्यांचे खासगीकरण करून हे सरकार त्यांच्या ठराविक लोकांसाठीच महाराष्ट्र विकण्याचे काम करत आहे. त्याच्या विरोधात काँग्रेस आवाज उठवणार.

“आमचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी आढावा बैठका घेण्यास सांगितलं आहे. त्यानुसारच आम्ही आढावा घेत आहोत. आज पंढरपूरची बैठक पार पडली. पंढरपूर, मोहोळमध्ये मी बऱ्याचदा आली आहे. आज प्राथमिक स्वरुपात बैठक घेतली. बूथ यंत्रणा, विविध इतर गोष्टी याबाबत आम्ही आढावा घेतला. मागच्या दहा वर्षात देशात आणि राज्यात लोकांवर अन्याय होतो आहे. ५० खोक्यांचं सरकारही आपल्यावर थोपवलं गेलं आहे. ते काही जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही. आज जनता निराश आणि हताश झाली आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही आता सरकार आणू. त्याच अनुषंगाने आज बैठक घेतली.” असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मागील महिन्यापासून देशभर आढावा बैठकी घेण्याचा आदेश दिला आहे. याचाच एक भाग म्हणून बूथ यंत्रणा सज्ज करण्यासाठी पंढरपूरमध्ये आ. प्रणिती शिंदे यांनी आढावा बैठक घेतली. येथील धनश्री हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली.

या बैठकीस ज्येष्ठ नेत्या सूनेत्राताई पवार, याबैठकीला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सेक्रेटरी अॅड. मनीश गडदे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूनंजय पवार, ज्येष्ठ नेते बजरंग बागल, देवानंद गुंड पाटील, सुहास भाळवणकर, किशोर महाराज जाधव, प्रशांत शिंदे, जिल्हा काँग्रेस ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव, मिलिंद अढवळकर, काँग्रेसचे नागेश गांगेकर, अक्षय शेळके, अशोक पाटोळे, दत्तात्रय बडवे, शंकर सुरवसे, मधुकर फलटणकर, सागर कदम, समीर कोळी, अशपाक सय्यद, नागनाथ अधटराव, सेवादलाचे गणेश माने, राजश्री लोळगे, तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, यांच्यासह जिल्हा आणि तालुका काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here