‘त्या जागांवर गदा न येऊ देणे, ही जबाबदारी माझ्यावर’ गुणरत्न सदावर्ते

0

मुंबई,दि.27: मराठा आरक्षणाकरिता मराठा समाजाने आंदोलन सुरू केले होते. राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा मसुदा आहे, सुचना आहे असे अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ म्हणाले. झुंडशाहीने कायदे बदलता येत नाही. उद्या लाखो लोक घेऊन अजून कोणी आले तर आपण कायदा बदलणार आहोत का? असा सवाल त्यांनी आपल्याच सरकारला केला. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला नसून ते नोटिफिकेशन नोटिस आहे, असे म्हणून एकूण सर्व बाबींना सोबत घेऊन, मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत काय काय सुरू आहे, या सर्व गोष्टींसाठी लवकरच न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “खुल्यावर्गातील जे जे कुणी असतील, त्यांच्या अधिकाराच्या जागा साबूत ठेवणे, त्या जागांवर गदा न येऊ देणे, ही जबाबदारी माझ्यावर आहे. याच बरोबर जे खरे मागास आहेत, म्हणजेच, जे लोहार भाऊ असेल, सुतार भाऊ असेल, न्हावी भाऊ असेल, अशा कष्टाच्या आधारेही मागास आहेत, सामाजिक मागास आहेत, त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्थरावर आण्यासाठीचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे जे संविधान आहे. जे प्रभू श्री रामचंद्रांच्या समानतेच्या आधारावर, नीतीच्या आधारावर, सामान्य हिंदुस्तानला न्याय देण्यासाठीचे आहे. त्याच्या साठीची आमची पैरवी आहे. त्याच्या रक्षणाची माझी आणि डॉ. जयश्री पाटील यांची जबाबदारी आहे.”

रोहित पवार आणि संजय राऊत यांच्यावर टीका

ते नोटीफिकेशन नाही, नोटीस आहे तुम्ही म्हणताय, मराठ्यांच्या तोंडाला पान पुसली असं तुम्हाला म्हणायच आहे का? या प्रश्नावर सदावर्ते यांनी अचानक रोहित पवार आणि संजय राऊत यांच नाव घेतलं व बोलताना त्यांची जीभ घसरली. “तो रोहित पवार आणि संजय राऊत यांनी स्वत:ची जागा तपासावी. माझ्यावर टीका करणाऱ्या त्या चाटूंना बोलण्याचा अधिकार नाही” असं ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील कोणत्या कॉलेजमधून लॉ पास झालेत?

“मनोज जरांगे पाटील यांचं ज्ञान मला माहित नाही. ते कोणत्या कॉलेजमधून लॉ पास झालेत? कोणत्या विषयात डॉक्टरेट केलीय? मराठा समाजातील विनोद पाटील यांच्यासारखी विद्वान माणस बोलली असती, तर मी समजू शकतो. पण मनोज जरांगे पाटील काय बोलतात, यावर पत्रकारांना टीआरपी मिळू शकतो” असे गुणरत्ने सदावर्ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here