मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार खासदारांच्या बैठकीत घेतले तीन मोठे निर्णय

0

मुंबई,दि.6: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार खासदारांच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेतले आहेत. अजित पवारांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिंदे गटातील आमदार अस्वस्थ होते. अजित पवार यांच्या महायुतीतील एन्ट्रीमुळे शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. अजित पवार आल्याने शिंदे गटाचे अनेक आमदार अस्वस्थ आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली बैठक

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांची नाराजी दूर करण्याच्या कामाला लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून का आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली. यावेळी त्यांनी सर्व आमदार आणि खासदारांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. अजित पवार यांच्या रुपाने आता शिंदे गटासमोर आव्हान निर्माण झालं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आतापासूनच कामाला लागले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली. यावेळी त्यांनी राजीनामा देणार असल्याचं वृत्त फेटाळून लावलं. आपल्या राजीनाम्याच्या बातम्या कुणी पेरल्या याची आपल्याला माहिती असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच अजित पवार आल्याने आपल्या गटावर काही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री म्हणून मीच राहणार आहे. 2024नंतरही मीच मुख्यमंत्रीपदी असेल असं एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांना सांगितलं.

तीन मोठे निर्णय घेतले

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेतले आहेत. विकास कामांवर ध्यान केंद्रीत करा. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पाच आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दर 15 दिवसाला म्हणजे महिन्यातून दोन वेळा आमदारांना भेटण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याशिवाय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शिवसेनेचा महामेळावा आयोजित करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. तसेच काहीही अडचण आली तर आमदारांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.

1.प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पाच आमदारांची निरीक्षक म्हणून नियुक्ती

2.दर 15 दिवसाला म्हणजे महिन्यातून दोनदा आमदारांना भेटणार

3.निवडणुकीवर मंथन करण्यासाठी शिवसेनेचा महामेळावा घेणार


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here