Amol Mitkari On Raj Thackeray | हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा; अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर टीका

0

मुंबई,दि.30: Amol Mitkari On Raj Thackeray: रामनवमीनिमित देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. मोठ्या भक्तिभावाने रामनवमी साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी महिलांनी बाईक रॅली काढली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अलीकडेच गुढी पाडवा मेळाव्यातून हिंदू बांधवांना रामनवमी जोरात साजरी करण्याचं आव्हान केलं होतं. आज देशभरात रामनवमी साजरी केली जात आहे. पण राज ठाकरे स्वत: विदेश दौऱ्यावर गेले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी अप्रत्यक्ष टोलेबाजी केली आहे.

अमोल मिटकरी यांची टीका | Amol Mitkari On Raj Thackeray

यावेळी अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा अप्रत्यक्ष उल्लेख तथाकथित ‘हिंदूजननायक’ असा केला आहे. अमोल मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित “हिंदूजननायक” परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता रामनवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. याला म्हणतात “हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा.”

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले, “एकदा राज्य माझ्या हातात द्या, मी सगळा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन. कुणीही यावं आणि टपली मारून जावं, हे चालणार नाही. आता मी माहिमचं अतिक्रमण दाखवलं ते महाराष्ट्रातल्या मुस्लीम वर्गाला तरी मान्य आहे का? हा कसला दर्गा आहे? कुणाची समाधी आहे? माशाची समाधी आहे का?”

“राज्यकर्ते जेव्हा दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतलेले असतात, तेव्हा बाहेरचे लोक काय करतात? हे मी तुम्हाला माहीमचं अतिक्रमणावरून दाखवलं आहे. त्यामुळे माझ्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे, यंदा रामनवमी जोरात साजरी करा. 6 जूनला शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. मी रायगडावर जाणार आहे. तुम्ही सगळ्यांनी दक्ष राहा, सावध राहा. एप्रिलमध्ये माझ्या उरलेल्या दोन सभा होणार होत्या, त्या सभाही मी घेणार आहेत,” असं राज ठाकरे म्हणाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here