Ajit Pawar On Ashok Chavan: अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या दाव्यावर अजित पवार म्हणाले…

0

मुंबई,दि.३: Ajit Pawar On Ashok Chavan: अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या दाव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट यांनीही प्रत्यारोप केला आणि माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. आमदार संजय शिरसाट म्हणाले,’काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही, अशोक चव्हाण आणि बाकीच्या नेत्यांचं पटत नाही, त्यांना काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळत नाही. यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही आमदार संजय शिरसाट यांनी केला. 

हेही वाचा Martyr Aurangzeb: उद्धव ठाकरेंनी कौतुक केलेल्या शहीद औरंगजेब यांच्याबद्दल घ्या जाणून

पिंजऱ्यातील पोपटाने काढलेल्या चिट्ठीत | Ajit Pawar On Ashok Chavan

संजय शिरसाट यांच्या दाव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “अशोक चव्हाण भाजपात जाणार असं संजय शिरसाटांना पिंजऱ्यातील पोपटाने काढलेल्या चिट्ठीत दिसलं का?” असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. ते सोमवारी (३ एप्रिल) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “पिंजऱ्यात ठेवलेला पोपट बाहेर येतो आणि एक एक चिट्ठी चोचीने उचलतो. त्या चिट्ठीत संजय शिरसाटांना अशोक चव्हाण भाजपात जाणार असं दिसलं आहे का? काल सर्वांनी अशोक चव्हाण यांचं भाषण ऐकलं. कुणीही काहीही बोलायला लागलं आहे.”

असं असलं तरी आपण अशोक चव्हाण यांना… | Ajit Pawar

“अशोक चव्हाण भाजपात जातील असं मला अजिबात वाटत नाही. असं असलं तरी आपण अशोक चव्हाण यांना याबाबत विचारू शकता. माझी आणि अशोक चव्हाण यांची भेट झाली, तर मी त्यांना याबाबत विचारेन,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

…हा शब्द शरद पवारांचा नाही

अजित पवार अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर म्हणाले, “शरद पवारांनी ५०-५५ वर्षांच्या राजकीय जीवनात काम करताना, सर्वच गोष्टींचा आदर केला आहे. अतिशय कष्ट घेऊन आमचे घराणे पुढे आले आहे. पण, अरविंद सावंतांनी सांगितले, रिक्षावाला हा माझा शब्द होता. शरद पवारांचा नाही.”

छत्रपती संभाजीनगर येथील सभेला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. यावरून वेगवगळे राजकीय अर्थ काढण्यात येत होते. यावरही अजित पवारांनी भाष्य केले आहे. “उद्धव ठाकरेंना पाठीचा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे आजही ते ताठ बसता येईल, अशी खुर्ची वापरतात. म्हणून सभेच्या ठिकाणीदेखील अशीच खुर्ची ठेवण्यात आली होती. यात खुर्चीबद्दल कोणताही भेदभाव केलेला नाही,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here