रेल्वे स्टेशन पोलीस चौकीच्या पोलीस उपनिरीक्षकाची लाच प्रकरणात जामीनावर मुक्तता

0

सोलापूर,दि.१: सदर बझार पोलीस ठाणे अंतर्गत रेल्वे स्टेशन पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षिरसागर यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या तक्रारदार व त्याच्या इतर सहकाऱ्यांविरुद्ध रेल्वे स्टेशन परिसरातून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक व पार्किंग केल्यास त्यावर कोणताही खटला दाखल न करण्यासाठी मासिक हप्ता म्हणून रक्कम रुपये १२,०००/-ची लाच मागत असल्याची तक्रार सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती.

तक्रारदाराकडून मासिक हप्ता म्हणून रक्कम रुपये १२०००/- स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिरसागर यांना रेल्वे स्टेशन पोलीस चौकीत रंगेहात पकडून अटक करण्यात आलेली होती. त्यानुसार आरोपीच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर प्रकरणात सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. एन. पांढरे सोऻ यांनी आरोपी प्रशांत क्षिरसागर पोलीस उपनिरीक्षक यांची रक्कम रुपये २०,०००/- च्या जामिनावर मुक्तता केली.

यात आरोपी प्रशांत क्षिरसागर यांच्या वतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. मल्लिनाथ बिराजदार, ॲड. पैगंबर सय्यद, ॲड. राणी गाजूल यांनी तर सरकार पक्षातर्फे श्रीमती क्यातम काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here