सोलापूर,दि.12: Police Patil Reservation: सोलापूर क्रमांक 1 या उपविभागात प्रवर्गनिहाय लोकसंख्येच्या अनुषंगाने आरक्षण सोडत प्रक्रीया राबविण्यात आली. उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे खेड, एकरुख, हगलुर, मोहितेवाडी, नंदूर. तरटगांव व समशापूर या ठिकाणची रिक्त पोलीस पाटील पदे रिक्त होती. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर आणि बार्शी या दोन तालुक्यातील 40 पोलीस पाटील पदे रिक्त होती. त्या पदाची आरक्षण सोडत मंगळवारी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात काढण्यात आली. यामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील समशापुर हे गाव अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले आहे तर बार्शी तालुक्यातील लक्ष्याची वाडी, इर्लेवाडी व तडवळे हे तीन गावे अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाले आहेत.
Police Patil Reservation: सोलापूर जिल्हा पोलीस पाटील आरक्षण सोडत
उपविभागीय अधिकारी क्रमांक 1 सदाशिव पडदुणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवारी सकाळी 11 वाजता या आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार रियाज कुरणे, निवासी नायब तहसीलदार विश्वजित गुंड, फय्याजोद्दीन शेख, सुशांत देशपांडे, सुरेश स्वामी, व्हि एम नाकेदार या अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
अनुसूचित जातीच्या तीन जागेमध्ये समशापुर महिला, एकरूप व तरटगाव अनुसूचित जाती सर्वसाधारण, अनुसूचित जमातीच्या दहा जागांमध्ये लक्ष्याचीवाडी, इरलेवाडी, तडवळे हे तीन गावे महिलेसाठी राखीव झाली आहेत. उर्वरित हगलूर, ढेंबरेवाडी, नागोबाची वाडी, सौंदरे, शेळगाव मा, बळेवाडी, हिंगोनी आर हे सात अनुसूचित जमाती सर्वसाधारण साठी आरक्षित झाले आहेत.
विशेष मागास प्रवर्गाच्या दोन जागेपैकी नंदुर सर्वसाधारण लवळगाव महिलेसाठी राखीव झाले आहे. विजाअ मध्ये उंडेगाव महीला, तांबेवाडी, सर्जापुर विजाअ सर्वसाधारण राखीव झाले आहे.
भज – दोन जागेपैकी खेड सर्वसाधारण तर भोइंजे महिला राखीव. भज -ड एका जागेसाठी मिर्जनपूर सर्वसाधारण, ओबीसीच्या 15 जागे पैकी चिखर्डे, महागाव, भोयरे, पिंपरी आ हे महिलेसाठी राखीव झाले आहेत तर उर्वरित मोहितेवाडी, नारीवाडी, जहानपूर, कळंबवाडी, पानगाव, सुरडी, गाडेगाव, अरणगाव, कांदलगाव, हिंगणी, साकत हे ओबीसी सर्वसाधारण साठी राखीव. EWS या प्रवर्गाच्या चार जागेसाठी फपाळवाडी हे महिलेसाठी राखीव असून भांडेगाव हे अनाथ साठी राखीव आहे गोडसेवाडी व मालेगाव हे दोन सर्वसाधारणसाठी राखीव झाले आहे.