Police Patil Aarakshan: सोलापूर जिल्ह्यातील या गावांचे पोलीस पाटलांचे आरक्षण जाहीर

0

सोलापूर,दि.13: Police Patil Aarakshan: दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील गावांचे पोलीस पाटलांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील वीस गावच्या पोलीस पाटलाची आरक्षण सोडत बुधवारी काढण्यात आली. यामध्ये तांदुळवाडी अनुसूचित जाती महिलेसाठी तर शेगाव अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाले आहे.

दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील गावांचे पोलीस पाटलांचे आरक्षण | Police Patil Aarakshan

उपविभागीय अधिकारी क्रमांक दोन विठ्ठल उदमले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवारी सकाळी अकराच्या दरम्यान ही आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडती मध्ये अक्कलकोट तालुक्यातील दहिटणेवाडी, हंदराळ, बासलेगाव, शावळ, मिरजगी या पाच गावचे पोलीस पाटील पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

अनुसूचित जातीच्या दोन जागेमध्ये तांदुळवाडी महिला तर कुरकोट अनुसूचित जाती सर्वसाधारण राखीव झाले आहे. अनुसूचित जमातीच्या चार जागेसाठी शेगाव महिलेसाठी राखीव तर मनगोळी, वांगी गुर्देहल्ली हे तीन गावे अनुसूचित जमाती सर्वसाधारण राखीव झाले आहेत.

ओबीसीच्या सहा जागेपैकी बुऱ्हानपूर व संगोगी आ. हे दोन गावे महिलेसाठी राखीव झाले आहेत. तर वडगाव, उळेवाडी आलेगाव गौडगाव खु. ही गावे ओबीसी सर्वसाधारण साठी आरक्षित झाली आहेत.

भटक्या जमाती ब होनमुर्गी महीला तर सांगवी खू.सर्वसाधारण राखीव झाले आहे. तसेच विमुक्त जाती अ जेऊरवाडी सर्वसाधारण साठी राखीव झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here