750 कोटी रुपयाची नोट असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी केली अटक

0

नांदेड,दि.30: 750 कोटी रुपयाची नोट असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. फसवणूक करणारे नवनवीन पद्धतीने अनेकांची फसवणूक करतात. अमेरिकेचे बनावट डॉलर (1 billion usd dollar note) दाखवून त्याच्या बदल्यात भारतीय चलन घेऊन फसवणूक करणाऱ्या तिघांना नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. नांदेडमध्ये आलेल्या तेलंगणातील या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणामधून आलेल्या एका टोळीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना गुप्त सुत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला आणि तेलंगणातून आलेल्या या तिघांना अटक केली. या टोळीकडून तब्बल एक बिलियन डॉलरची एक बनावट नोट जप्त केली. या बनावट नोटेची भारतीय चलनातील किंमत 750 कोटी रुपये असल्याचे आरोपी भासवत होते.

आरोपींनी या नोटेचे अनेकांना आमिष दाखवले होते. नांदेडमध्ये एका जणाला नोटे देण्यासाठी आले होते. या डॉलरच्या बदल्यात भारतीय चलनातील एक लाख रुपयाची मागणी करत असल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींकडून कार, रोख रक्कम, मोबाईल आदी साहित्य असा 11 लाख 52 हजार 300 पन्नास रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन लोकांना पोलिसांनी अटक केली. तर दोघे जण गर्दीचा फायदा घेत पसार झाले आहे. त्यांचा शोध सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here