दि.१२:राजधानी दिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळण्यात आलाय. पाकिस्तानी नागरिक असलेल्या मोहम्मद अशरफ अली या दहशतवाद्याला दिल्लीत ग्रेनेड, एके ४७ रायफल आणि इतर हत्यारांसहीत अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ही कारवाई केलीय. लक्ष्मी नगरच्या रमेश पार्क भागातून एका दहशतवाद्याला अटक केलीय. अटकेतील व्यक्ती पाकिस्तानी नागरिक असल्याचं समोर येतंय.
बनावट भारतीय ओळखपत्राच्या आधारे ही संशयास्पद व्यक्ती दिल्लीत फिरताना आढळली. या दहशतवाद्याकडून ग्रेनेड, एके ४७ रायफल, अतिरिक्त बंदूक मॅगझीन आणि ६० राऊंड्स, एका हातगोळा तसंच ५० राऊंडसोबत दोन अत्याधुनिक पिस्तूल पप्त करण्यात आल्या आहेत.
Delhi Police Special Cell arrests a terrorist of Pakistani nationality from Ramesh Park, Laxmi Nagar. He was living with a fake ID of an Indian national. One AK-47 assault rifle with one extra magazine and 60 rounds, one hand grenade, 2 sophisticated pistols with 50 rounds seized
— ANI (@ANI) October 12, 2021
दिल्लीत अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्याचं नाव मोहम्मद अशरफ अली असल्याचं समजतंय. दिल्ली अली अहमद नुरी नाव धारण करून तो राहत होता. अशरफ अली याला पाकिस्तानच्या आयएसआयकडून दिल्लीसहीत भारताच्या इतर भागांत दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात आल्याचंही सांगितलं जातंय. अशरफ अली याच्याकडून बनावट भारतीय पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे.
उल्लेखनीय म्हणजेच, तीन दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणेकडून हायअलर्ट जारी करण्यात आला होता. दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेची सूचना देण्यात आली होती.