सोलापूर,दि.६: पोलिसांनी जुळे सोलापूरातील (Jule Solapur) प्रतिष्ठित ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर कारवाई केली आहे. सोलापूर शहर भागातील, प्लॉट नं. १४६ / ९४७, द्वारका नगर ओम गर्जना चौकाजवळ, जुळे सोलापूर येथे बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालु असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमी वरुन दि. ०४/०४/२०२२ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता सापळा रचुन, प्लॉट नं. १४६ / ९४७, द्वारका नगर ओम गर्जना चौकाजवळ, जुळे सोलापूर या ठिकाणी बोगस गिऱ्हाईक पाठवून बातमीची खात्री करून १८.४५ वा. छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे.
गुन्ह्यातील महिला आरोपी १ ) निर्मला शंकर राजपूत हिने ०१ पिडीत महिलेस आपल्या रहाते घरात अटकावून ठेवून तिची शारीरीक पिळवणुक करून तिस पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्या कडून वेश्या व्यवसाय करवून घेवून तिच्या कंमाईवर स्वतःची उपजिविका करीत असताना मिळून आल्याने तिच्या विरूद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ व ६ भा.द.वि.सं.क. ३७० ( अ ), ( २ ), प्रमाणे विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर शहर गुन्हा दाखल करुन ०१ पिडीत महिलेची सुटका करण्यात आली आहे.
आरोपीस न्यायालयात दि. ०५ / ०४ / २०२२ रोजी हजर केले असता न्यायालयाने आरोपीची ०४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा कडील पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री हे करीत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त हरिष बैजल व पोलीस उपआयुक्त ( गुन्हे / विशा ) बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री , पोहेकॉ ११४२ राजेंद्र बंडगर, मपोहेकॉ ७७७ सुवर्णा काळे, पोना ८४६ महादेव बंडगर, मपोना ६३९ अर्चना गवळी, मपोना ३०० ज्योती मोरे, मपोकॉ १४३९ तृप्ती मंडलिक, पोकॉ ७२४ दादा गोरे यांनी उत्कृष्ट व शिताफीने कामगिरी करुन सदरचा छापा यशस्वी केला.
पोलिसांनी सोलापूर शहरातील सुज्ञ नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे बेकायदेशीपणे चालणाऱ्या कुंटणखान्याबाबत कोणास काही माहिती प्राप्त झाल्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे प्रभारी अधिकारी महिला पोलीस निरिक्षक कुर्री यांचा मोबाईल क्रमांक ८८८८८ ९ ४२३६ यावर संपर्क साधून माहिती देण्यात यावी. आपली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.