पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला मंजूरी, 1 कोटी घरांमध्ये सोलर प्लांट बसवणार

0

नवी दिल्ली,दि.29: पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. याद्वारे एक कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. याशिवाय 15,000 रुपये वार्षिक उत्पन्नही असेल. 2 किलोवॅटपर्यंतच्या सौरऊर्जा प्रकल्पांसाठी सरकार 60 टक्के अनुदान देईल, त्यानंतर 1 किलोवॅट अधिक वाढवायचे असल्यास 40 टक्के अनुदान दिले जाईल. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला सुमारे 78,000 रुपये अनुदान मिळणार आहे.

या योजनेसाठी 75,000 कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. जर एखाद्या RWA किंवा समूह हाऊसिंग सोसायटीला इलेक्ट्रिक वाहनांसाठी कॉमन लाइटिंग किंवा चार्जरसाठी प्लांट उभारायचा असेल तर 18,000 रुपये प्रति किलोवॅट सबसिडी दिली जाईल.

पंतप्रधान मोदींनी केली होती घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच घोषणा केली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यासाठी ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ जाहीर केली होती. पीएम मोदी म्हणाले होते की योजना तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रात रूफटॉप सोलर सिस्टीम (छतावर सौर ऊर्जा) प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

सौरऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी सर्व निवासी ग्राहकांना, विशेषत: तरुणांना ‘PM Suryaghar.gov.in ‘ वर अर्ज करून पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना बळकट करण्याचे  आवाहन केले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here