Narendra Modi | माझे भाग्य आहे की मी चार पिढ्यांपासून या समाजाशी जोडलेलो आहे: PM नरेंद्र मोदी

Narendra Modi: बोहरा समाजाकडून मला प्रेम मिळालं

0

मुंबई,दि.10: PM Narendra Modi On Dawoodi Bohra: PM नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईत वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी दरम्यान या वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. यानंतर ते मुंबईतील मरोळ भागात दाऊदी बोहरा (Dawoodi Bohra) समुदायाच्या कार्यक्रमाला पोहोचले. त्यांनी अल जामिया तूस सैफियाह सैफ अकादमीच्या एका कॅम्पसचे उद्घाटन केले. कार्यक्रमात बोलताना मोदींनी (Narendra Modi) बोहरा समाजाने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलंय अशा शब्दात कौतुक केलं.

बोहरा समाजाकडून मला प्रेम मिळालं | PM Narendra Modi On Dawoodi Bohra

बोहरा समाजाकडून मला प्रेम मिळालं आणि आजही ते अबाधित आहे. परदेशात गेलो तरी बोहरा बांंधव भेटतात. बोहरा समाजामुळे गांधीजींचं स्मारक झाल्याचंही नरेंद्र मोदी म्हणाले.

मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य आहे | Narendra Modi

यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणाले की, माझी बोहरा समाजाकडे एक तक्रार आहे. तुम्ही कृपया त्यात सुधारणा करावी. तुम्ही मला वारंवार आदरणीय पंतप्रधान म्हणत आहात. पण, मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य आहे. मी मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नाही. माझे बोहरा समाजाशी चार पिढ्यांपासून संबध आहेत. यावेळी मोदींनी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंसोबत असलेल्या संबंधांवरही भाष्य केले. तसेच, बोहरा समाजाच्या कामाविषयीही माहिती दिली.

मी चार पिढ्यांपासून या समाजाशी जोडलेलो आहे

मोदी पुढे म्हणाले की, माझे भाग्य असे आहे की, मी चार पिढ्यांपासून या समाजाशी जोडलेलो आहे. विकासाच्या बाबतीत बोहरा समाजाने नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे. आज अल्जामिया-तुस-सैफियाह सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार हे त्याच विकासाचे उदाहरण आहे. मला देशाताच नाही तर, परदेशातही बोहरा बांधव भेटायला येतात. बोहरा समाज माझ्यासाठी खूप जवळचा आहे, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी याआधीही अनेकदा बोहरा समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याआधी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत म्हटलं होतं की, पसमांदा, बोहरा मुस्लिम समुदयांपर्यंत पोहोचण्याचं तेव्हा आवाहन केलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा हा बीएमसी निवडणुकीशी जोडला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here