“तुम्हाला वाटेल मोदी इन्कम टॅक्सची टीम पाठवेल” पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

वाराणसी,दि.१८: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवस आपल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. येथील नागरिकांना पंतप्रधानांकडून१९ हजार कोटी रुपयांच्या ३७ योजनांचं गिफ्ट देणार आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मोदींनी नमो घाटावर काशी तमिल संगममच्या दुसऱ्या सीजनचा शुभारंभ केला. त्यासोबतच, वाराणसी ते कन्याकुमारीपर्यंत जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडाही दाखवला.

नरेंद्र मोदींनी नदेसर क्षेत्रातील कटींग मेमोरियल स्कुलमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला संबोधित केले. तसेच, सरकारी योजनांचा शतप्रतिशत लाभ घेण्याचे आणि या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. येथील मेमोरियल स्कुलच्या ग्राऊंडवर जाऊन मोदींनी दिव्यांग बांधवांनी लावलेल्या स्टॉलला भेट दिली. यावेळी, दिव्यांग बांधवांसोबत आपुलकीचा संवादही साधला. मोदींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पंतप्रधान मोदी या व्हिडिओत एका दिव्यांग बांधवाशी संवाद साधताना त्याचे शिक्षण, कमाई आणि दिव्यांग बांधवांसाठीच्या लाभाशी संबंधित योजनांची माहिती विचारत आहेत. तो युवकही मोदींच्या सर्व प्रश्नांची बिनधास्तपणे उत्तर देत आहे. मोदींकडून युवकास इन्कम संदर्भात प्रश्न विचारला जातो. या प्रश्नावर उत्तर देताना तो युवक थोडासा दबावात दिसून येतो. त्यावेळी, मोदीही हसत हसत मिश्कील टिपण्णी करतात. इन्कम नको सांगू, तुम्हाला वाटेल मोदी इन्कम टॅक्सची टीम पाठवेल, असा मजेशीर संवाद मोदींनी दिव्यांगा बांधवांशी केला आहे. 

पंतप्रधान मोदी आणि दिव्यांग बांधवांमधील संवाद

पीएम मोदी: पढ़ाई कितनी की?

युवक: पढ़ाई M.com पूरी की है. अभी सिविल सर्विसेस की तैयारी कर रहा हूं.

पीएम: यहां क्या-क्या योजना का लाभ मिला आप लोगों को?

युवक: यहां पेंशन मिला है, बाकि दुकान संचालन के लिए अभी आवेदन भी किया है. 

पीएम: क्या दुकान चलाना है?

युवक: सीएचसी सेंटर चलाते हैं. उसी में स्टेशनरी डाल रहे हैं 

पीएम: कितने लोग आते हैं सीएचसी सेंटर पर?

युवक: काउंट तो नहीं करते हैं. फिर भी 10-12 लोग आ जाते हैं आराम से. 

पीएम: महीने भर में कितनी कमाई हो जाती है? 

(इस पर युवक संकोच करता है और दबी आवाज में कहता है काउंट नहीं किया.)

पीएम: अरे मत बताइए. कोई इनकम टैक्स वाला नहीं आएगा. आपको लगता होगा इनकम टैक्स भेजेगा…


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here