नाशिक,दि.१२: PM नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे मराठीतून भाषणाला सुरूवात केली. नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. राजमाता जिजाऊ यांचीही आज जयंती आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, “माझे भाग्य आहे की, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीसाठी नाशिक येथे आलो आहे. भारत की नारी शक्ती राजमाता जिजाऊ यांचीही आज जयंती आहे. जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो, याचा मला खूप आनंद होत आहे.”
जिजाऊ यांच्या नारीशक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाला घडविले. देवी अहिल्यादेवी होळकर, लोकमान्य टिळक, विर सावरकर यांनी या भूमीने घडविले. पंचवटीत श्रीरामही येऊन गेले, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. स्वामी विवेकानंद यांचे मार्गदर्शन देशातील युवकांसाठी प्रेरणादायक आहे. देशाची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या पाचमध्ये आली आहे. देशातील स्टार्टअप कंपन्यांची संख्या जगात पहिल्या तीनमध्ये झाली आहे. एकापेक्षा एक इनोव्हेशन आता देशात होत आहे. देशभरातून विक्रमी संख्येने पेंटेट दाखल होत आहेत. यासर्वांचे आधार भारताचे युवापिढी आहेत. असेही मोदी म्हणाले.
तुम्हाला मी २१ व्या शतकातील सर्वात भाग्यशील पिढी समजतो. माझा सर्वात जास्त विश्वास भारताच्या युवकांवर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये सांगितले. राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्था पहिल्या तीनमध्ये आणण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील सरकारपेक्षा जास्त वेगाने काम सध्याचे सरकार करत आहे, असं कौतुकही नरेंद्र मोदींनी केले. तसेच वंदे भारत जोरात सुरू आहे. भारतातील विमानतळं आधुनिक पद्तीने तयार करण्यात आले आहे. जगाच्या विमानतळांबरोबर त्यांची गणना होत आहे. देशात नवी एनआयटी, आयआयटी तयार केल्या. विदेशात जाणाऱ्यांना प्रशिक्षणं दिले. मेड इन इंडिया, फायटर प्लेन, तेजस आकाशाची उंची गाठत असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितले.