Most Popular Leader In The Word: पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

Most Popular Leader In The Word: सलग तिसऱ्या वर्षी ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

0

नवी दिल्ली,दि.5: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते (Most Popular Leader In The Word) ठरले आहेत. अमेरिकेची डेटा इंटेलिजन्स संस्था ‘द मॉर्निंग कंसल्ट’ने केलेल्या या सर्वेक्षणात मोदी यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष  जो बायडेन आणि ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह जगातील 22 देशांच्या नेत्यांना मागे टाकले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अप्रुव्हल रेटिंग 78 टक्के | Most Popular Leader In The Word

‘द मॉर्निंग कंसल्ट’ने 26 ते 31 जानेवारी या कालावधीत ‘ग्लोबल लीडर ॲप्रूव्हल रेटिंग’ हे सर्वेक्षण केले. यात पहिल्या स्थानी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अप्रुव्हल रेटिंग 78 टक्के राहिले. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेज ओब्राडोर हे 68 टक्के रेटिंगसह दुसऱ्या स्थानी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष ॲलेन बेर्सेट हे 62 टक्के रेटिंगसह तिसऱ्या स्थानी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बेनेस हे 58 टक्के रेटिंगसह चौथ्या स्थानी, तर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डासिल्व्हा हे 50 टक्के रेटिंगसह पाचव्या स्थानी राहिले. 

तीन वर्षांपासून मोदीच अग्रस्थानी | PM Narendra Modi

जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत पंतप्रधान मोदी हे मागील 2 वर्षांपासून सर्वोच्च स्थानी आहेत. मे 2020 मध्ये ते 84 टक्के अप्रुव्हल रेटिंगसह पहिल्या स्थानी होते. सप्टेंबर 2021 मध्ये मोदी 70 टक्के अप्रुव्हल रेटिंगसह पुन्हा पहिल्या स्थानी राहिले.  जानेवारी 2022 मध्ये मोदींना 71 टक्के लोकांनी पसंती दिली होती. ऑगस्ट 2022 मध्ये त्यांचे अप्रुव्हल रेटिंग वाढून 75 टक्के झाले. यातही ते जगात अव्वल स्थानीच राहिले.

Most Popular Leader In The Word
पंतप्रधान नरेंद्र मोदी

जो बायडेन 7व्या स्थानी

7 व्या स्थानावरील बायडेन यांचे अप्रुव्हल रेटिंग 40 टक्के आहे. ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक हे 16 व्या स्थानी फेकले गेले आहेत. 

लाेकप्रिय नेते

नाव        लाेकप्रियता (%)
नरेंद्र माेदी (भारत)   78
जाे बायडेन (अमेरिका) 40
जस्टिन ट्रृड्यू (कॅनडा)    40
लिओ वराडकर  (आयर्लंड) 37
ऋषी सुनक (ब्रिटन)     30
इमॅन्युएल मॅक्राॅन (फ्रान्स)   29


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here