नवी दिल्ली,दि.19: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज प्रकाशपर्व निमित्त देशाला संबोधित केले आणि यादरम्यान त्यांनी तीनही कृषी कायदे (Agricultural law) मागे घेण्याची घोषणा केली. तीनही कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, कृषी अर्थसंकल्पात पूर्वीच्या तुलनेत 5 पट वाढ करण्यात आली आहे. (agriculture law latest news)
उत्तर प्रदेशातील अनेक योजनांच्या पायाभरणी आणि उद्घाटनासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी ही घोषणा केली आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले, “माझ्या पाच दशकांच्या कार्यकाळात मी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहिल्या आहेत. जेव्हा देशाने मला पंतप्रधान केले तेव्हा मी कृषी विकास किंवा शेतकऱ्यांच्या विकासाला सर्वाधिक महत्त्व दिले दिले.”मी माफी मागतो, शेतकऱ्यांना आम्ही कृषी कायद्यांच्या संदर्भातील गोष्टी समजावून सांगण्यात कमी पडलो, असेही मोदी म्हणाले. (Prime Minister Narendra Modi announced on Friday that the three farm laws introduced by the government will be repealed in the upcoming Parliament Session)
Today I want to tell everyone that we have decided to repeal all three farm laws: PM Narendra Modi pic.twitter.com/ws353WdnVB
— ANI (@ANI) November 19, 2021
सुरुवातीला गुरु नानक यांनी महत्त्वाची शिकवण दिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या असल्याचं मोदी म्हणालेत. तसंच माझ्या सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोत्तम प्राधान्य दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधानांनी आजच्या संबोधनात संदेशात शेतकऱ्यांच्या योजनांबाबत महत्त्वाची दिली आहे.
गेल्या 4 वर्षांत 1 लाख कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. तसंच केंद्र सरकारचं कृषी बजेट पहिल्यापेक्षा 5 पटीनं वाढल्याचं ते म्हणालेत. शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 62 हजार कोटी रुपये थेट जमा केले. अधिकाधिक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
100 पैकी 80 शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे. शेतकऱ्यांसाठी कृषीकर्ज दुप्पट केलं. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.