सोलापूर,दि.29: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शेतकरी उत्पादक संस्था यांना समभाग निधी योजनेअंतर्गत निधी वितरण करणे, शेतकरी उत्पादक संस्थेच्या शेतकऱ्यांशी संवाद साधणे तसेच पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 10 वा हप्ता लाभ वितरित करणे यासाठी दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या वेळी प्रधानमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डीडी किसान व डीडी नेशनल राष्ट्रीय चैनल वरून केले जाणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट वेबकास्ट http://pmindiawebcast.nic.in वर देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त कृषी तथा पी एम किसान योजनेचे राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख धीरजकुमार यांनी दिली आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा पीएम किसान योजनेच्या जिल्हा समन्वयक शमा पवार यांनी केले आहे.