दि.6: नोटांवर महात्मा गांधी यांच्या छायाचित्रा ऐवजी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टागोर यांचे छायाचित्रे छापण्याचा विचार रिझर्व्ह बँक करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता आरबीआयने याबाबत खुलासा केला आहे. आरबीआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
आरबीआयने दिले स्पष्टीकरण
भारतीय चलन नोटांमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसून, महात्मा गांधींच्या ऐवजी कोणाचाही फोटो वापरण्यात येणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. वित्त मंत्रालय आणि आरबीआय भारतीय नोटांवर टागोर आणि कलाम यांचे फोटो वापरणार असून त्यांच्य छायाचित्रांचे नमुन्याचे दोन संच आयआयटी दिल्लीचे एमेरिटस प्रोफेसर दिलीप टी शहानी यांना पाठवण्यात आले आहेत. उच्चस्तरीय बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता आरबीआयच्या स्पष्टीकरणानंतर भारतीय चलन नोटांवर महात्मा गांधींशिवाय इतर कोणाचाही फोटो वापरण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.