मुंबई,दि.14: भारतामध्ये रोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर जारी केलं जातात. जून 2017 च्या आधी दर 15 दिवसांनी इंधनाच्या दरांमध्ये बदल केला जायचा. आंतरराष्ट्रीय बाजारापेठेमध्ये कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास डब्यू टीआय क्रूड 78.48 डॉलर्स प्रति बॅरलला उपलब्ध होतं. तर ब्रेंट क्रूड ऑइल 82.52 डॉलर प्रति बॅरलला पोहोचलं आहे. देशातील तेल विक्री करणाऱ्या कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज पहाटे इंधनाचे नवीन दर जारी केले आहेत.
या राज्यांमध्ये इंधन महागलं
महाराष्ट्रामध्ये पेट्रोल 79 पैशांनी तर डिझेल 76 पैसे प्रति लिटरने महाग झालं आहे. बिहारमध्ये पेट्रोलचे दर 52 तर डिझेचे दर 48 पैसे प्रति लिटरने वाढले आहेत. या शिवाय हिमाचल प्रदेश, झारखंड, पंजाब आणि तामिळनाडूमध्येही पेट्रोल तसेच डिझेलचे दर वाढल्याचं चित्र दिसत आहे. दुसरीकडे गुजरामध्ये पेट्रोल 38 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 41 पैसे प्रति लिटरने स्वस्त झालं आहे. हरियाणामध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घसरण झाली आहे.
4 महानगरांमधील इंधनाचे दर
– दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लीटरला आहे.
– मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लीटरला आहे.
– कोलकात्यामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटरला आहे.
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.65 रुपये आणि डिझेल 94.25 रुपये प्रति लीटरला आहे.