Jammu Kashmir: परवेझ हजाम रोज 2 किमी एका पायावर जातो शाळेत, Video

0

दि.4: जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) मधील कुपवाडा येथील परवेझ अहमद हजाम (Parvez Ahmed Hajam) एकाच पायावर रोज दोन किलोमीटर अंतर चालत शाळेला जातो. सर्व अवयव व्यवस्थित असताना देखील अनेक वेळा काही लोकांकडून फक्त कारणे सांगितली जातात. परंतु, समाजात अशा अनेक दिव्यांग व्यक्ती आहेत, ज्या एखादा अवयव कमी असला तरी त्यावर रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संकटाचा कोणतेही कारण न सांगता सामना करत असतात.

14 वर्षीय परवेझ अहमद हजाम (Parvez Ahmed Hajam) शाळेत जाताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो पण त्याने हार मानलेली नाही. आपली स्वप्न सत्यात उतरवण्याची त्याच्यामध्ये जिद्द पाहायला मिळत आहे. 

कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम मावर गावातील परवेझ या तरूणाला एक पाय नाही. परंतु, असे असताना देखील अनेक अडचणींचा सामना करत हा तरूण रोज दोन किलोमीटर चालत शाळेत जातो. परवेझ हा सध्या 9 वीच्या वर्गात शिकत आहे. काश्मीरमध्ये उष्णतेसाठी प्रत्येक घरात शेकोटी केली जाते. 2009 ला परवेझच्या घरी देखील अशीच शेकोटी करण्यात आली होती. परंतु, या शेकोटीच्या आगीत परवेझ पूर्णपणे भाजला होता. कुटुंबीयांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले. परंतु, त्याचा एक पाय कापावा लागला, अशी माहिती त्याचे वडील गुलाम अहमद हजाम यांनी दिली.

हेही वाचा Kalaburagi Accident: खासगी बस आणि कंटेनरच्या भीषण अपघातात ७ जणांचा होरपळून मृत्यू

रोज चार किलोमीटर अंतर चालतो

एक पाय नसला तरी परवेझने आपल्या स्वप्नांना मुरड घातली नाही. उलट आणखी जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो रोज दोन किलोमीटर चालत जातो आणि परत दोन किलोमोटीर चालत शाळेतून घरी येतो, असे रोज चार किलोमीटर अंतर तो एका पायावर चालतो. परवेझ याचे प्रथामिक शिक्षण सरकारी शाळेत झाले. परंतु, पाचवीनंतर त्याला आपल्या घरापासून दोन किलोमीटर असंर असलेल्या हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागला. शिक्षण विभागाने स्थानिक समाजकल्याण विभागामार्फत आवश्यक सहकार्य करून त्याला मोफत व्हील चेअर दिली. परंतु, गेल्या चार वर्षांपासून या व्हील चेअरची त्याला फारशी मदत झाली नाही.

हुशार विद्यार्थी आहे

परवेझ हा अभ्यासात हुशार विद्यार्थी असून अभ्यासाशिवाय इतर उपक्रमांमध्ये देखील तो सहभाग घेत असतो. त्याच्या हायस्कूलचे शिक्षक एजाज अहमद सांगतात, तो वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी असून त्याचा कायम पहिला नंबर असतो. शिवाय वादविवाद आणि इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यात नेहमीच तो आघाडीवर असतो. शारीरिकदृष्ट्या कमकुवत असूनही तो आमच्या शाळेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here