Pauri Bus Accident: 50 जणांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 32 ठार

0

दि.5: Pauri Bus Accident: उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. 45 ते 50 जणांना घेऊन जाणारी एक बस खोल दरीत कोसळली आहे. बस अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी रावाना झालं आहे. ही बस 500 मीटर खोल दरीत पडल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. आतापर्यंत 6 जणांना जखमी अवस्थेत दरीतून बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मंगळवारी रात्री उशिरा पौडी येथे बस अपघात झाला, ज्यामध्ये वऱ्हाडींना घेऊन जाणारी बस सिमडी गावाजवळ 500 मीटर खोल दरीत कोसळली. बस हरिद्वार जिल्ह्यातील लालधंग येथून पौडी येथील बिरखल गावाकडे जात होती. वाटेत अचानक बस अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाला. कोटद्वार आणि पौरीपासून सुमारे 150 किमी अंतरावर झालेल्या या अपघातात सुमारे 32 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच पौडीचे जिल्हा दंडाधिकारी विजय कुमार जोगदंडे, एसडीएम स्मिता परमार घटनास्थळी पोहोचले.

धुमाकोट आणि रिखनिखल पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाल्याची माहितीही टम्टा यांनी दिली. ही बस 500 मीटर खोल दरीत कोसळली असून आतापर्यंत ६ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here