परकला प्रभाकर यांनी सांगितले या निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकणार?

0

मुंबई,दि.17: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे पती आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांनी या निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल याचा आकडा सांगितला आहे. हुकूमशहाची अखेर बेडया किंवा शवपेटीतच होतो अशा परखड शब्दांत अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला यावेळी 220 च्या वर मजल मारता येणार नाही तर एनडीएतील इतर घटक पक्षांना केवळ 35 जागा मिळतील, असा दावा परकला प्रभाकर यांनी केला आहे.

मोदी सरकारचा अंत जवळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. द वायर या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इतिहासाचा दाखला देत हुकूमशहाची अखेर कधी ना कधी तरी होतेच याचे विश्लेषण आकड्यानिशी केले.

2014 ला भाषणाचा प्रभाव लोकांवर पडला

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दाच नव्हता. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात एका बाजूला हिंदू आणि मुस्लिम तर दुसऱ्या बाजूला बेरोजगारी, भ्रष्टाचार, दारिद्रय़ असे मुद्दे होते. त्या भाषणाचा प्रभाव लोकांवर पडला. त्यावेळी हिंदुस्थानात भ्रष्टाचाराविरोधात संताप होता.

इलेक्ट्रोल बॉण्डचा मुद्दा तापला

त्यामुळे मध्यमवर्गीय, गरीब, सुशिक्षित तरुण हे भाजपासोबत गेले आणि मोदींची एक लाट आली. या लाटेसोबतच  घटकपक्षांची मतही मिळाली. 1998 मध्ये असलेली 25 टक्के मते पुढे 29 टक्क्यावर गेली. त्यानंतर बालाकोट आणि पुलवामा हल्ल्याच्या मुद्दय़ावर आणखी 4 ते 5 टक्क्यांची भर पडली. मात्र आता भ्रष्टाचार वाढलाय, इलेक्ट्रोल बॉण्डचा मुद्दा तापला. त्यामुळे भाजपाची मतांची टक्केवारी पुन्हा घसरल्याचे निरीक्षण परकला प्रभाकर यांनी नोंदवले.

महाराष्ट्रात 48 पैकी एनडीएला केवळ 23 जागा मिळतील. येथे भाजपला 19 जागांवर फटका बसेल. असे परकला प्रभाकर यांनी सांगितले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एनडीएला 48 पैकी 42 जागा मिळाल्या होत्या. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here