‘जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही’ पंकजा मुंडे

0

बीड,दि.12: भाजपा नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरून दसरा मेळाव्याला संबोधित केले. मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ. बीडमधील दसरा मेळाव्याची सुरुवात पंकजा मुंडे यांनी एका शायरीने केली. या भाषणातुन पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. ‘मी कुणालाही घाबरत नाही’, असे विधान पंकजा मुंडेंनी थेट जरांगेंना उद्देशून केले आहे. तसेच ‘आपल्याला आपला डाव टाकायचाय’, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी जरांगेचा डाव उधळून टाकण्याचा इशारा दिला आहे.

त्या ठिकाणी एक मुस्लीम बांधव मुंडे साहेबांचा फोटो घेऊन नाचतोय. मुंडे साहेबांनी दिलेला शब्द आज मी खरा करून दाखवला आहे. मी भगवान भक्तीगड उभा केलाय. कळालं, मी महाराष्ट्राची वाघीण आहे! आता शांत बसा. तसेच या दसरा मेळाव्याला उपस्थित असलेले मंत्री धनंजय मुंडे म्हणजेच ‘माझा धनु भाऊ’. त्याबरोबर या ठिकाणी माझी बहिण देखील उपस्थित आहे. तसेच माझा मुलगा आर्यमन देखील भगवानबाबांच्या दर्शनाला आलाय. माझा मुलगा आर्यमानपेक्षा ही जनता मला जास्त प्रिय आहे. पोटच्या लेकरापेक्षा मी तुमच्यावर माया करते. माझ्या निवडणुकीच्या निकालानंतर काही लेकरांनी जीव दिला. असे मुंडे म्हणाल्या. 

गोंडस लेकरू असा उल्लेख 

भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी आलेल्या लक्ष्मण हाके यांचा पंकजा मुंडे यांनी गोंडस लेकरू असा उल्लेख केला आहे. माझ्या मेळाव्याचं मी कुणाला निमंत्रण देत नाही. माझा सन्मान ठेवून आलेल्या लक्ष्मण हाके यांचं मी स्वागत करते. येथे आलेले 18 जातीचे बांधव तुम्हाला मी दरवर्षी साष्टांग दंडवत घालते. का घालते? कारण माध्या वडिलांनी मरताना माझ्या झोळीमध्ये तुमची जबाबदारी टाकली आहे. तुम्ही मी जिंकल्यावर देखील इज्जत दिली आणि मी हरल्यानंतर देखील तु्म्ही जास्त इज्जत दिली. त्यामुळे आता मी तुम्हा सर्वांना इज्जत देण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक गावा-गावात कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. 

जात बघून देणाऱ्यांची औलाद गोपिनाथ मुंडेंची नाही. आम्हाला काम करणाऱ्या लाोकांच्या पाठीशी उभं राहायचंय. जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही, असे विधान करत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता जरांगेंना टोला लगावला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here