‘पाकिस्तान समर्थकांना गोळ्या घातल्या पाहिजेत’ काँग्रेस मंत्र्याचे वक्तव्य

0

बेंगलूरू,दि.9: पाकिस्तान समर्थकांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे काँग्रेस मंत्र्याने म्हटले आहे. कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेस नेते केएन राजन्ना यांनी शनिवारी विधानसभेत पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे वक्तव्य करून वाद निर्माण केला. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस नेते सय्यद नसीर हुसैन यांच्या समर्थकांनी कर्नाटक विधानसभेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.

बुलडोझर कारवाईचे समर्थन

राजन्ना म्हणाले, “काय झाले? काँग्रेसची प्रतिमा ठीक आहे. त्यातही सुधारणा झाली आहे. जर कोणी घोषणाबाजी केली किंवा पाकिस्तानचे समर्थन केले असेल, तर त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत. त्यात काहीही चुकीचे नाही.” कर्नाटकच्या मंत्र्यानेही उत्तर प्रदेशातील बुलडोझर कारवाईचे समर्थन केले. ते म्हणाले की, आरोपींची घरे बुलडोझरने पाडण्यासारख्या सरकारच्या पावलांमुळे जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आली आहे.

ते म्हणाले, ‘उत्तर प्रदेशात घरे पाडली जातात. यासाठी कायदा नाही, पण कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात नाही का? आम्ही याला विरोध करणार नाही.” राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, 27 फेब्रुवारी रोजी विधानसभा कॉरिडॉरमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा दिल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती.

विधानसभेत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आरोपांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी कर्नाटक फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने व्हिडिओ तपासला होता. या घटनेच्या व्हिडिओमध्ये छेडछाड झाली नसल्याचे फॉरेन्सिक अहवालाने पुष्टी दिली असून त्यानंतर काही जणांना अटक करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here