दि.२२: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी प्रकाशपर्व निमित्त देशाला संबोधित केले आणि यादरम्यान त्यांनी तीनही कृषी कायदे (Agricultural law) मागे घेण्याची घोषणा केली. MSP च्या हमीशिवाय ते मान्य करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केल्यानंरही विरोधक आणि शेतकरी सरकारवर हल्लाबोल करत आहेत.
एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जर एनपीआर आणि एनआरसी कायदे कृषी कायद्याप्रमाणे रद्द केले नाहीत तर ते बाराबंकीला आणखी एक शाहीन बाग बनवतील असा इशारा ओवेसींनी दिला आहे.
उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “मी पंतप्रधान मोदी आणि भाजपाला कृषी कायद्यासारखे CAA मागे घेण्याचे आवाहन करतो कारण ते संविधानाच्या विरोधात आहे. जर त्यांनी एनपीआर आणि एनआरसी वर कायदा केला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि इथे आणखी एक शाहीन बाग बांधली जाईल,” असे ओवेसींनी म्हटले.
दिल्लीतील शाहीन बाग हे सीएए आणि एनआरसीच्या विरोधाचे केंद्र होते. २०२०च्या सुरुवातीला कोविड -१९मुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सीएए विरुद्धच्या आंदोलनासाठी शेकडो महिलांनी अनेक महिने तळ ठोकलेल्या निषेध स्थळाची जागा रिकामी केली होती.
ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही हल्ला चढवला. “पंतप्रधान मोदी हे देशातील सर्वात मोठे ‘नौटंकीबाज’ आहेत आणि चुकून ते राजकारणात आले आहेत, नाहीतर चित्रपटसृष्टीतील लोकांचे काय झाले असते. सर्व पुरस्कार मोदींनी जिंकले असते,” असे ओवेसी म्हणाले.
“तीन कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर, पंतप्रधान म्हणाले होते की त्यांच्या ‘तपस्या’ (तपस्या) मध्ये काही कमतरता होत्या. आपले पंतप्रधान किती मोठे अभिनेते आहेत हे यावरून कळते,” ते पुढे म्हणाले. खरी तपस्या शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनांमध्ये केली होती ज्यात सुमारे ७५० शेतकरी मरण पावले, असे ओवेसी म्हणाले.
मोदी स्वतःला नायक बनवण्याची एकही संधी सोडत नाहीत, असेही ओवेसी म्हणाले. एआयएमआयएम प्रमुखांनी दावा केला की पंतप्रधान मोदींनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना संतुष्ट करण्यासाठी कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली.