बगद्दल दर्गाह येथे ऊर्स निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

अक्कलकोट,दि.९ः सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान  बगद्दल दर्गाह ( जि.बिदर) (कर्नाटक) येथे ऊर्सनिमित्त दि. १२ ते १४ मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नागनहळ्ळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष   जावेद पटेल  यांनी दिली. 

बग्गद्दल येथील दर्गाह अस्ताने कादरिया मुस्लिम धर्मींयासह सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे.  हज़रत  कादरशाह वली नागोरी यांचे उर्स जलसा गुरूवार (जुमेरात) (दि.१२)  ते  शनिवार (दि. १४) पर्यंत साजरा केला जात आहे. यामध्ये गुरूवारी सायंकाळच्या नमाजनंतर साडेपाच वाजता संदल होणार आहे. तर रात्री नमाजानंतर साडेआठ वाजता संदल माली आहे.

शुक्रवारी ( दि.१३ मे ) महाप्रसाद वाटप होणार आहे. त्यानंतर रात्री दहा वाजता  चिरागाँ रात उलमा और मशायखीन का खिताब आणि कव्वाली मेहफिल साजरा होईल. त्यामध्ये भारतातील प्रसिद्ध  मारूफ  खव्वाल हजरात कलाम यांची कव्वाली होईल. शनिवार १४ मे रोजी सकाळच्या प्रार्थनेनंतर  खतम-ए- कुरान शरीफ व फातेहाखानी होईल.

या उर्स मध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सामील व्हावे, असे आवाहन शाह खलीफा अलहाज डॉ. मुहम्मद इदरीस अहमद साहाब कादरी, बग्दली यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here