बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

सोलापूर,दि.17: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्यामार्फत दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त एच.एस.नलावडे यांनी सांगितले.

या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, ट्रेनी, आयटीआय, वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, स्टाफ नर्स, ऑफिस असिस्टंट, पदवी, इलेक्ट्रीशीयन, मशिन ऑपरेटर अशा प्रकारची एकूण 450 पेक्षा जास्त रिक्त पदे उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचित केली आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त नलावडे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here