सोलापूर,दि.14 :जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांचे मार्फत दिनांक 20,21,22 डिसेंबर 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने हा ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात ट्रेनी, वेल्डर,फिटर, ईलेक्ट्रिशियन,ईन्सुरन्स ॲडव्हायझर, नर्सींग 10 वी पास/नापास,12वी डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट जीएनएम, बीएसी नर्सिंग, एक्स रे टेक्निशियन, सिटी स्कॅन टेक्निशियन अश प्रकारची एकुण 817 रिक्तपदे 08 उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसुचीत केलेली आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन ॲप्लाय करावे, जेणेकरुन त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्स अथवा टेलीफोन याद्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.
आयोजित ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे, याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा solapurrogar1@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधाव, असे अवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.